सय

अर्धाकच्चा
चिंबकोवळा
अलगद ओला
तृणांत शिरला
थेंब

कापुसला
श्यामलरंगी
दाटून आला
तुडुंब भरला
मेघ

ओली गच्च
कोसळवेडी
दंवात उरली
उरात भरली
सर

सुगंधली
रंगबावरी
क्षणात भिजली
उन्हात सजली
माती

काठोकाठ
व्याकुळ डोळां
घनास फितली
मनात रुतली
सय!

- अमोल कपोले

9 प्रतिसाद to “सय”

  1. PRAFUL Says:

    Kharach khoopach SUNDAR, A PRATIM

  2. Priya Says:

    अप्रतिम !! अतिसुंदर !!!

  3. आल्हाद alias Alhad Says:

    व्वा!
    छान आहे!!

  4. inkblacknight Says:

    ह्या कवितेचा आशय तर छान आहेच, पण फॉर्म विशेष आवडला…

    http://asachkahitari.wordpress.com/


तुमचा अभिप्राय नोंदवा