पावसानंतर त्याचा
दर्वळ राहून जातो
तसा
गेल्यानंतर तुझा
वावर राहून जातो
पाउस सरतो विखरून थेंब
मातीत सांडलेले
तू गेल्यावर माझे शब्द
मौनात बांधलेले
अंगोपांगी टिपतो श्रावण
ओसरल्या थेंबांचे भास
एकलाच मग वेचित बसतो
रेंगाळलेले ओले श्वास
चिंब भोवती ओल्या भरते
तृप्त तजेली हिरवी भूल
नकळत ठायी पेरित जाते
तव भेटीची तहान खोल
- अमोल कपोले







जुलै 16, 2009 at 12:54 pm |
छानच आहे कविता …
एक लक्षात आल … सम्पूर्ण कविता न वाटता एकाच विषयाचे चार सुटे विचार वाटले मला …
http://asachkahitari.wordpress.com/