मधुर भागवतने गाडी घेतली त्याची गोष्ट

अखेर मधुर भागवतने गाडी घेतली.
आता तुम्ही म्हणाल मधुर भागवत कोण?
तर मधुर भागवत हे फक्त नाव आहे, आयडेन्टिफिकेशनसाठी.
खरं तर तो मधुर कांबळे किंवा मधुर जाधव किंवा महंमद गौस किंवा आणखी काही असू शकतो.
तर फॉर द सेक ऑफ आयडेन्टिफिकेशन तो मधुर भागवत आहे.
आता तुम्ही म्हणाल मधुर भागवतने गाडी घेतली यात काय मोठं.
आजकाल सारेच गाडी घेतात. मग याचंच अप्रूप का?
तर गाडी घेणे ही घटना निश्चितच अप्रूप नाही, पण दखलपात्र आहे.
कारण मधुर भागवतचा यापुढचा प्रवास हा गाडी घेणे किंवा न घेणे यापैकी एका निर्णयाचा परिणाम असेल.
आणि त्याचबरोबर त्याचा गाडी घेण्याचा निर्णय ही त्याच्या आतापर्यंतच्या बरृया वाईट, नैतिक-अनैतिक प्रवासाची परिणती आहे.
त्यामुळेच त्याने गाडी घेणे या घटनेला अनेक बाजू आहेत, कारणांच्या आणि परिणामांच्याही.
पण त्याने गाडी घेण्याचा निर्णय घेतल्याने पुढचे परिणाम (त्याच्या दृष्टीनं नैतिक आपल्यापैकी काहींच्या दृष्टीने अनैतिक, किंवा व्हॉटेव्हर अकॉर्डिंग टू युअर थिंकिंग) बरृयापैकी स्पष्ट झाले आहेत. तेव्हा आपलं डोकं त्यावर शिणवा कशाला?
तर आता आपण मधुर भागवतने गाडी का घेतली त्याकडे वळू.
त्याकडे वळायचं म्हटलं तर मोठा यू-टर्नच घ्यावा लागेल.
जसा मधुरनं घेतला, किंवा आपल्यापैकी बरेचजण घेत असतील.
किंवा त्यांना घ्यावा लागत असेल. असो.
तर यू-टर्न.

(क्रमश:)

One Response to “मधुर भागवतने गाडी घेतली त्याची गोष्ट”

  1. आल्हाद alias Alhad Says:

    लिहा. अजून लिहा.
    पुढील भाग यावा ही अपेक्षा.


तुमचा अभिप्राय नोंदवा