Asking a rickshawwallah to drop me at Tadobacha Maal on a rainy evening wouldn’t have drawn any different reaction. The middle-aged fellow first frowned at my enquiry and immediately giving it a second thought, agreed to take me to the desired destination.

“What on earth has made you go to a place like that?” he couldn’t help asking me.

“Just to meet some dear ones” I replied.

“Hmm.. I wonder how anybody could live in such a weird place” quipped the rickshawwallah.

I didn’t answer his query.

Considering my silence as disapproval to his remarks, he kept on driving mutely.

The evening had grown darker as we left the city behind. The road ahead was becoming narrower as we progressed towards the outskirts of the city. The gentle drizzle of rain had now grown heavy with an addition of harsh and noisy wind.

 

Putting the highway behind, the rickshaw now took a left turn. The road ahead now was a typical country road. Darkness had fully descended as we drove like lone rangers through the thick curtain of the rain.

 

Suddenly the rickshawwallah pressed on the breaks and the vehicle came to an abrupt halt. I was about to peep out to see what made him stop the rickshaw when a tiny figure, half drenched, appeared.

“Could you please drop me at Shindemala?” and without waiting for the rickshawwallah’s answer he just sneaked into the rear seat besides me.

“Don’t worry about the money, I am paying whatever the fare” the tiny fellow replied to our driver who was about to open his mouth. Nodding in approval the rickshawwallah started the engine. The journey resumed with a surprise addition to our vehicle.

 

I looked at the fellow sitting alongside me. He was a small man in his late thirties or early forties perhaps. Bald head and uneven features had made his face look like a portrait terribly gone wrong. Noticing my attention, the fellow gave me a broad smile revealing his decayed, tobacco stained tooth. I smiled and turned my gaze outside to have a look at the countryside. The rain had slowed down now and there was a pleasant drizzle going on. Everything was drenched in the mist of darkness. Not a single house was in sight. A momentary blinking of distant light in some farm house was the only sign indicating and ensuring we were not all alone.

 

We had almost crossed all the farms and farm houses as the rickshaw came to a halt to drop our fellow passenger at his desired destination.

I turned to see my fellow passenger. The seat was vacant. I looked outside. There was no one.

“Where did that fellow go?” asked the rickshawwallah.

“I don’t know” I replied.

Both of us got out of the vehicle to see if the wicked-looking fellow had cheated on us by running away without paying the fare.

To our astonishment, there was no one in sight. It was impossible for a person to hide as we were in the middle of a deserted place. There was hardly any tree. All of a sudden the rickshawwallah almost jumped into the driver’s seat.

“Get into the rickshaw, quickly” he almost yelled at me.

Surprised by his sudden reaction, I climbed back into the vehicle.

He drove on like a madman.

I late him drive in silence for some time.

As he overcame the excitement and fear, I asked,

“What happened?”

“We’ve just had a narrow escape”

“What?”

“Yes sir, It was Bappa Murari”

“Bappa?”

“Bappa Murari, loyal servant of late Jaisingh Patil, a landlord of this place, rude and cruel fellow.”

“What’s that got to do with this? And what is this narrow escape about?”

“Yes, it certainly was a narrow escape, because-” The rickshawwallah now slowed down as my destination got nearer.

“Because what?”

“He’s a dead man. Died fifteen years ago, two years after his master’s death”

“What? You mean-”

“-That’s what I mean sir” the rickshawwallah did not late me utter that word.

“How do you know? Have you seen him?”

“No sir, but heard a lot about him. Them.”

“You mean Bappa and the landlord”

“Yes sir. People say Bappa was a small fellow with a wicked face and even wicked mind, and his master was even more deadly than him, a stout, strong, tall and handsome prince possessing a shrewd and cruel mind.”

He slowed down the rickshaw. We had reached my place. I suddenly began feeling a flow of fresh energy through my veins. Something incredible was happening to me, a strange and lusty feeling gripped me. It was time to act. Now.

……………….

The rickshawwallah stopped the vehicle but didn’t kill the engine, waiting for the passenger to get out. As the passenger stood out, he now noticed his strong and stout persona, heavy frame, with a princely, charming face. But something was terribly wrong with him. What was it? The rickshawwallah wondered.

Then it struck him as a thunder.

The eyes of the passenger, they were blazing with cruelty and rage.

The driver suddenly realized.

It was a shocking revelation.

Feeling dumbstruck, the driver tried to race the engine.

But it was too late now.

…………….

नन्ना – मराठीच्या भवितव्याविषयी डॉ. अरुणा ढेरे यांची मुलाखत

मराठीत ज्या प्रमाणात मागील पिढ्यांमध्ये कोशकार्य, परिभाषा निर्मितीसाठी संशोधन केलं गेलं, त्या प्रमाणात आज असं काम होताना दिसत नाही. याचं कारण काय? अशी कोणती कामे करण्याची आज गरज आहे?

मराठीत माझे वडील ज्या प्रकारचं संशोधन करत होते, त्यात त्यांच्या पूर्वसुरींनी उभ्या केलेल्या प्रचंड कामाची मदत झाली. मराठी संस्कृतीच्या संवर्धनाच्या हेतूने मराठी भाषेविषयी संशोधनाचं कार्य सर्व बाजूंनी उचलून धरण्याचं कार्य त्या पिढीतील संशोधकांनी केलं. त्यासाठी त्यांनी निरनिराळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले. मी जेव्हा १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडातील संशोधनाचे काम करू लागले, तेव्हा लक्षात आलं की अव्वल इंग्रजीच्या शिक्षणातूनच त्या पिढीतील संशोधकांना मराठीच्या जतनासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याचं भान आलं. ते भान घेऊन पूर्णत: देशी पद्धतीने ही माणसं काम करत राहिली. त्यांनी कोश निर्माण केले, नियतकालिकं काढली, लोकगीतं गोळा केली, लोकसंस्कृतीची लहान लहान अंगं तपासली, लोक-संस्कृतीच्या उपासकांकडून त्यांच्या रचना मिळवल्या. ज्ञानाच्या पातळीवर भाषा सर्व अंगांनी मोठी झाली पाहिजे हे लक्षात घेऊन या माणसांनी ही कामं केली. त्यांच्यासमोर भौतिक अडचणी भरपूर होत्या. म्हणजे वाहनांची सोय नसणं, अत्याधुनिक साधनं नसणं इ. पण भाषेच्या संवर्धन आणि जतनासाठी काय करायला पाहिजे याची दृष्टी त्यांच्याकडे होती.
माझे वडील संशो-धनाच्या कार्यासाठी एखाद्या गावी जात तेव्हा कळे, की अमुक एका माणसाकडे शिवकालीन कागदपत्रे आहेत. तेव्हा ती मिळवण्यात फार अडचणी येत. भाऊबंदकीतील वादातून कोणी या कागदपत्रांचा गैरवापर करेल का, सरकारदरबारी ही कागदपत्रे गहाळ होतील अशी भीती आणि हे आमचं आहे, आम्ही ते कोणाला देणार नाही, ते गुप्त राहील, अशी भावना सामान्य लोकांमध्ये असायची. लोकांनाच त्यांचं महत्त्व लक्षात आलेलं नव्हतं. अशा सगळ्या अडचणींना तोंड देत त्या पिढीच्या संशोधकांनी काम केलं.
आताच्या काळात सर्व प्रकारची भौतिक साधनं उपलब्ध आहेत, तरीही ज्या पद्धतशीरपणे संशोधनाचे कार्य व्हायला पाहिजे तेवढं होत नाही. आज शैक्षणिकदृष्ट्या आणि विज्ञान तंत्रज्ञानात आपण जेवढी प्रगती केली आहे, त्या प्रमाणात मराठीत परिभाषा घडवण्याचं काम होत नाही. माझ्या वडिलांनी लोकसंस्कृतीच्या अभ्यासाची परिभाषा घडवली. लोकनागर अभ्यासपद्धती यासारखे नवे शब्द निर्माण केले. नव्या वाटा निर्माण करणं, नव्या परिभाषा घडवणं हे त्या काळात या लोकांनी केलं. आज नव्या ज्ञानाच्या प्रकाशात नवी परिभाषा मराठीत घडवण्याचं काम ठप्प झालं आहे. शासनाच्या पातळीवर विश्वकोशाचं काम होतं, त्या जोडीला संस्कृतीकोश अथवा कृषिकोशासारखी कामं शासनाच्या मदतीने सुरू आहेत. श्रीराम कामतांनी चरित्रकोशाचं मोठं काम केलं. राज्य मराठी विकास संस्थेने मध्यंतरी वस्त्रोद्योग कोश सिद्ध केला. इतरही छोट्या-मोठ्या कोशांचं काम चालू आहे. पण ज्या प्रमाणात ज्ञानाचा, माहितीची एक मोठा पट आपल्यापुढे खुला होतो आहे, त्या तुलनेत हे काम खूप कमी पडतं आहे. दुसरं असं, की याचं समाजाला जितकं महत्त्व वाटायला पाहिजे तेवढं वाटत नाही, किवा महत्त्व वाटावं इतकं हे काम समाजासमोर येतही नाही.
माहिती संकलनाचं कार्य हे मूलभूत कार्य आहे, मात्र या माहितीवर संस्कार करून, त्याचा अन्वयार्थ लावून वेगळं मोठं काम उभं राहायला हवं, ते होत नाही. त्यामुळे नुसतंच संकलनाला महत्त्व आलेलं दिसतं. त्यात समग्रतेची दृष्टी नसते, समन्वयाचा अभाव असतो. आणि सुटी-सुटी, छोट्या पातळ्यांवरची कामं ही काही खरी नाहीत. तंजावरच्या मराठी ठेव्याबद्दल आपण मोठ्या अभिमानाने बोलतो, पण तिथली हस्तलिखितं इकडे यावीत, त्यावर अभ्यास व्हावा यासाठी प्रयत्न होत नाहीत. यातील काही हस्तलिखितं चेन्नईच्या संग्रहालयात आहेत, ती इकडे आणण्यासाठी सरकारी पातळीवरच प्रयत्न व्हायला हवेत, ते तितक्या गांभीर्याने, कळकळीने होत नाहीत. इतर भाषा आणि मराठी, विशेषत: सीमावर्ती भागातील भाषा आणि मराठी भाषा यांच्यातील देवघेव, एक-मेकांच्या भाषांवर झालेला परिणाम, त्यातून झालेले सांस्कृतिक बदल आणि परिवर्तनं, छोट्या छोट्या जमातींवर झालेले भाषिक परिणाम, या सगळ्याचा अभ्यास होत नाही. हे सगळे प्रकल्प छोटे आहेत, पण या साऱ्या अभ्यासातून एकूणच भाषेचा पैस आपल्याला अजमावता येतो आणि त्यामुळे आपलीच भाषा टिकवण्याला, समृद्ध करण्याला मदत होते. हे करण्यासाठी आपल्याकडे संशोधन प्रकल्पांकडे लक्ष दिलं जात नाही, तसे विषयही निवडले जात नाहीत, आणि जर कोणी निवडून धडपड केली, तर त्याच्या मागे पाठबळ उभं करण्याचं काम कोणतीच संस्था करताना दिसत नाही. अर्थात यालाही अपवाद आहेत, पण ते अत्यल्प !

मराठीच्या जतन आणि संवर्धनासाठी संस्थात्मक पातळीवर काय करता येईल?

सरकार आणि सरकारी संस्था यांच्या जोडीला टाटा मूलभूत संशोधन संस्थेसारखी संस्था आणि विद्यापीठं यात सहभागी होऊ शकतील. कारण विद्यापीठांचे भाषा विभाग आहेत. पुणे विद्यापीठात मराठी भाषा भवन निर्माण करावं आणि सगळ्या भारतीय भाषांचा तुलनात्मक अभ्यास तिथे व्हावा, भाषिक आदानप्रदान व्हावं आणि मराठी निरनिराळ्या भाषांशी जोडली जावी, असं आमचं स्वप्न होतं, पण ते तसंच राहिलं. विद्यापीठं यासंदर्भात खूप मोठं योगदान देऊ शकतील. कारण विद्यापीठांवर ताण कमी असतो आणि संशोधन हे विद्यापीठांचं मुख्य ध्येय असतं. त्यामुळे त्या अंगाने विद्यापीठं खूप काही करू शकतील असं मला वाटतं.

साहित्य महामंडळासारख्या संस्था या संदर्भात काही करू शकतील का?

साहित्य महामंडळाने या प्रकारचं काम करणं ही अतिशय आनंददायी आणि आवश्यक गोष्ट आहे. पण तसं काही होत नाही. पूर्ण वर्षभर साहित्य संमेलनाची निवडणूक प्रक्रिया या पलीकडे काही काम होताना दिसत नाही. वर्धापनदिनासारखे काही कार्यक्रम होतात. यात पैशाची अडचण असेल, तर स्वत:चा महाकोश स्वत: निर्माण करणं आणि स्वायत्त होणं ही महामंडळाची पहिली गरज आहे. तसं झालं, तर त्यांना या उपक्रमांकडे गांभीर्याने लक्ष देता येईल. बृहन्महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांमध्ये अशी कामे करण्याची क्षमता निर्माण करून त्यांच्याकडे ती कामे सोपविली गेली, तर बरं होईल. कारण या संस्था आपल्याकडे तयार आहेत. पण त्यांची अडचण अशी आहे, की बाहेरच्या प्रदेशांत मराठी मंडळी कमी असतात, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सगळ्याच संस्था काही फारशा चांगल्या अवस्थेत नाहीत. इथे आपण सगळ्या मराठी सांस्कृतिक संदर्भांमध्येच जगत असतो, पण बाहेरच्या मंडळींना तसे संदर्भ निर्माण करावे लागतात, आणि त्यातच त्यांची सगळी शक्ती खर्ची पडते. मग ते अनेकदा हौसेच्या पातळीवरच राहतं. संस्कृतीची वरवरची अंगंच समोर येतात, कारण आंतरिक संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी जे पर्यावरण लागतं, ते तिथे उपलब्ध होणं अवघड असतं. अन्यथा, त्या संस्था हेही संशोधन कार्यासाठी एक चांगलं व्यासपीठ होऊ शकतील.

व्यक्तिगत पातळीवर काही प्रयत्न करता येतील का?

खरं तर आता जे थोडं फार काम चालू आहे, ते व्यक्तिगत पातळीवरच होताना दिसतं. शासनाचे प्रयत्न या बाबतीत कमी पडत आहेत असं मला वाटत नाही. पण, त्यामागे एक समग्रतेची दृष्टी नाही, समन्वय नाही. त्यामुळे आज भाषा संचालनालय काय करतं आहे याचा राज्य मराठी विकास महामंडळाला पत्ता नसतो, किवा पुरातत्त्व विभाग काय करतो आहे, याची कल्पना साहित्य संस्कृती मंडळाला नसते, अशी परिस्थिती आहे. खरं म्हणजे अशा प्रकारचं काम करणाऱ्या संस्था आपल्याकडे अस्तित्त्वात आहेत. त्यांच्यात समन्वय आणला, तर त्यातून भाषाविषयक एक मोठं काम उभं राहू शकतं. पण ते होत नाही.
पोषाख, खाणं इ. संस्कृतीची अविभाज्य अंगं आहेतच, पण हे नसूनही जेव्हा आपण स्वत:ला मराठी म्हणतो, ते कशामुळे? म्हणजे मराठी माणसाने आजवर चोखाळलेल्या ज्ञानमार्गातून आपली एक विशिष्ट घडण, मूल्यव्यवस्था निर्माण झाली, ज्यातून आपलं मराठीपण सिद्ध झालेलं आहे, की आपले या प्रदेशाशी असलेले संबंध, येथे असलेली आपली मुळं, यातून आपलं मराठीपण आलेलं आहे? वरवरचं काहीही नसताना जेव्हा आपण एखाद्या संस्कृतीची गोष्ट करतो, ती काय आहे? मग आपल्या आतापर्यंतच्या सांस्कृतिक परंपरेचा विचार आपल्या मनात कुठेतरी असतो का? तो माहीत नसताना मराठी म्हणून आपण शिल्लक राहू शकतो का? या सगळ्याचा विचार कुठेतरी केला पाहिजे.
आज माझ्यासारख्या लेखिकेला जगभरातील विविध देशांत विखुरलेल्या मराठी माणसांशी संवाद साधायचा असल्यास त्यासाठीची जी आवश्यक साधनं आहेत, ती कितपत मराठीला उपयुक्त आहेत? जगात सर्वत्र सर्वांना वापरतायेईल असा संगणकावर लिहिण्यासाठीचा एक मराठी फॉन्ट अद्याप आपण तयार करु शकलेलो नाही. व्हॉईस टू टेक्स्ट सॉफ्टवेअर आलंय, पण त्यात मराठी बोललेलं मराठीत टाईप होणं आज शक्य आहे का? त्याप्रकारची प्रणाली निर्माण करणं, अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यासाठी मराठीतून संवादाची साधनं निर्माण करण्याची गरज आहे. पण तसं होत नाही. त्यामुळे इंग्रजी आल्याशिवाय तुम्ही नवीन जगामध्ये प्रवेशच करु शकत नाही, हा जो समज निर्माण झालेला आहे, तो दूर होण्यासाठी हे सारं नवं तंत्रज्ञान वापरण्याच्या प्रणाली मराठीतून विकसित व्हायला हव्यात. हे आव्हान नव्या पिढीतील मुलांनी स्वीकारायला हवं. बाहेरच्या जगाशी संवादाशी भाषा म्हणून इंग्रजी महत्त्वाची असली, तरी समूहांतर्गत संवादासाठी मराठीचा आग्रह कायम ठेवायलाच हवा. जितका मराठी समूह निरनिराळ्या क्षेत्रांत अधिकारपदांवर जाईल, आणि जितक्या गोष्टींत त्याचं मत अनिवार्य होईल, तितकी त्याची भाषाही त्याने बरोबर नेली आणि तिचा आजच्या संदर्भातला विकास करणं मनावर घेतलं, तर ते काही फार अवघड नाही. एकीकडे जागतिकीकरणाच्या रेट्यात सांस्कृतिक सपाटीकरण अटळ आहे. हजारो भाषा मरत आहेत, छोट्या बोली नष्ट होत आहेत, हे अटळ आहे. पण त्याचा वेग किमान रोखणं, आणि आवश्यक गोष्टी, सत्वाच्या गोष्टी कायम राखणं हे केलंच पाहिजे.

एक भाषा म्हणून मराठी लवचिकतेत कमी पडते असं तुम्हाला वाटतं का?

असं नाही मला वाटत. फार पूर्वीपासून मराठीने संस्कृतबरोबरच अरबी, फारसी शब्द आपलेसे केले आहेत. इंग्रजी राजवटीनंतर आपण इंग्रजी आणि हिदीसुद्धा आपलीशी केली. अडचण अशी आहे, की बोलणाऱ्या माणसालाच आता मूळचे मराठी शब्द वापरायची लाज वाटते. त्या ऐवजी आम्ही दहा इंग्रजी शब्द वापरू . त्यामुळे आपले मूळ शब्ददेखील आपण हरवत चाललो आहोत. मूळचे संदर्भ हरवत चालले, की तो शब्द पण निरुपयोगी होतो. त्यामुळे मग तो शब्द कळेनासाच होतो. टांगातळ म्हटलं, तर नाही कळत आजच्या मुलांना. कारण मुळात टांगाच माहीत नाही, आणि तळही माहीत नाही, अशा कितीतरी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, ज्या आयुष्यातून हद्दपार झाल्या आहेत. त्यांच्याशी जोडलेले शब्दही शिल्लक राहात नाहीत. भोवतालचं जग बदललं, की त्यासोबत अनेक सांस्कृतिक संदर्भ नष्ट होतात. पूर्वी पिढ्यांचं अंतर जास्त असायचं. आता दर पाच वर्षांनंतर पिढी बदलते, असं आपण म्हणतो. त्यामुळे वेगवान बदलांच्या रेट्यात हे संदर्भ तसे टिकणारे नाहीत. हे आपण थोपवू शकत नाही. ते चांगलं की वाईट असा विचार करायला आपल्याला संधीच नाही इतक्या वेगाने हे बदल होत आहेत. अशा परिस्थितीत निदान काय टिकवायचं याचा समग्रतेचा विचार करून प्रयत्न व्हायला हवेत.

इंग्रजी भाषेत दरवर्षी कोणत्या नवीन शब्दांची भर पडली, त्यंाची यादी प्रसिद्ध केली जाते, तसे प्रयत्न आपल्याकडे होताना दिसत नाहीत..

होय, असे प्रयत्न आपल्याकडे होत नाहीत. मराठी शुद्धलेखनातही नियम बदलून, अर्थ न गमावता काही करता येईल का याचा विचार होत नाही. शब्दकोष नव्याने पुन्हा-पुन्हा मराठीत होत नाहीत. भाषेत नव्या शब्दांची जी भर पडते, त्याची दखल घेउन ते आपल्यात सामावून घेणं हे होत नाही. दुसरं असं, की आपल्याकडच्या भाषेची ओळख पाठ्यपुस्तकांतूनच पुर्वी होत असे. प्राचीन काळापासून ते आजच्या काळापर्यंतचे उतारे (गद्य आणि पद्य) त्यात समाविष्ट असल्याने भाषा कशी बदलत गेली याचं भान विद्यार्थ्यांना येत असे. आता शिक्षकांनाच त्याची जाणीव नाही. त्यामुळे मुलांनाही नाही. कारण जुनी मराठी वाचायला, समजायला अवघड जाते. तरीही भाषेची ओळख करुन देण्यासाठी ती एक अत्यावश्यक गोष्ट आहे. ती अधिक चांगल्या रितीने अभ्यासक्रमात समाविष्ट व्हायला हवी. भाषेच्या विकासाच्या दृष्टीने शिक्षकांनी त्याकडे लक्ष देऊन तिची ओळख करून देणं हेही गरजेचं आहे. वेगवेगळ्या बोलींमधले धडे असतात. त्यातील शब्दांच्या पलिकडे जाऊन त्यांच्या जिवंतपणाशी जोडून घेत त्या बोलींशी ओळख करून देणं व्हायला पाहिेजे. त्यामुळेच अभ्यासक्रमाच्या बाबतीतही खूप असमाधान आहे.

प्रमाणभाषा असणं हे आवश्यकच असतं. समूहातील एकात्मता टिकण्यात समान भाषा महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे प्रमाण भाषेची आवश्यकता आहेच. शिक्षणाचा हातच न धरलेल्या आणि बोली भाषेतच व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला प्रमाणभाषेत प्रवेश करणं अवघड वाटतं, आणि त्याच्याकडे त्याच्या भाषेची अस्मिता असणं हेही स्वाभाविक आहे. पण त्यांना प्रमाणभाषेकडे आणण्याचा आपला प्रयत्न असावा. त्यांच्या भाषेचा ओघ आपल्या भाषेत मिसळून प्रमाण भाषा आणखी समृद्ध झाल्या पाहिजेत. यात पुन्हा शालेय अभ्यासक्रमाचा वापर महत्वाचा ठरतो. त्या दृष्टीने ज्ञानवंतांच्या, अध्यापकांच्या पिढीने खूप काम करण्याची आवश्यकता आहे.

पूर्वप्रसिद्धी – लोकमत, मंथन पुरवणी – दि.२१ मार्च २०१०

हॅकिंगवरचं पहिलंवहिलं ई-मॅग – क्लब हॅक

कंप्युटर व्हायरस हा असा प्रकार आहे, की ज्याचं नाव घेताच आपली सिस्टिमही हँग होईल. इंटरनेटचा स्पीड वाढतोय, कंप्युटर, लॅपटॉपसह मोबाईलवरुन अॅक्सेसॅबिलिटी वाढतेय, तसा हॅकिगचा धोकाही वाढतोच आहे. नुकतंच चीनमध्ये हॅकर्सनी गूगलच्या साईटचं हॅकिग प्रकरण यासंदर्भात ताजंच आहे. पण, सुदैवाने व्हायरसमध्येही रस घेणारी मंडळी आहेत, जी सतत विविध प्रकारच्या ऑनलाईन आक्रमणांपासून आपल्यासारख्यांना वाचवण्यासाठी हॅकिगचे कौशल्य वापरत असतात. व्हायरस अथवा स्पायवेअर तयार करुन महत्त्वाची माहिती चोरणे, अकाउंटस हॅक करणे, माहितीचा गैरवारप करणे, असे गैरप्रकार करणाऱ्या हॅकर्सना शह देण्यासाठी काट्यानं काटा काढावा, या तत्वावर काम करणारे हॅकर्स म्हणजे एथिकल हॅकर्स. तर अशा भारतातील एथिकल हॅकर्सचा क्लब पुण्यात आहे, क्लब हॅक त्याचं नाव. या क्लब हॅकने नुकतंच हॅकिग आणि सायबर सिक्युरिटी या विषयाला वाहिलेलं ई-मॅगझिन सुरु केलं आहे. विशेष म्हणजे हॅकिग या विषयाला वाहिलेलं भारतातील हे पहिलंच ई-मॅगझिन आहे.
स्वत: सायबर सुरक्षा तज्ज्ञ असलेल्या रोहित श्रीवास्तव या तरुणाने क्लब हॅकची स्थापना केली. क्लब हॅकतर्फे २००७ पासून दरवर्षी डिसेंबरमध्ये पुण्यात हॅकर्सचं संमेलनही भरविण्यात येतं, जेथे हजेरी लावण्यासाठी फक्त भारतातूनच नव्हे, तर परदेशातूनही हॅकर्स आवर्जून येतात. अशा प्रकारचं भारतातील हे एकमेव संमेलन आहे. संगणक वापरणाऱ्या सामान्य माणसांमध्ये संगणक सुरक्षेविषयी प्रबोधन करण्याच्या हेतुने क्लब हॅकची स्थापना विना फायदा तत्वावर करण्यात आली आहे. सायबर गुन्हे सोडविण्यासाठी क्लब हॅकने पोलिसांशीही सहकार्य केले असून, तपासात तांत्तिक मदत देण्यासाठी आणि सायबर गुन्हेगारी बाबत जागृती करण्यासाठीही सहकार्य केले जाते. क्लब हॅकचं स्वरूप हे ओपन कम्युनिटी सारखं आहे. देशभरात त्याचे सदस्य असून ते विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत, ज्यात पोलिस अधिकारी, सायबर वकील, हॅकर्स, विविध टेक्नॉलॉजी कम्युनिटीजचे सदस्य तसेच विद्यार्थीही आहेत.
एथिकल हॅकिग या विषयाला वाहिलेलं मॅगझीन असावं अशी आमची सर्वांची खूप दिवसांपासून इच्छा होती आणि कोणीतरी पुढे येवून ते सुरु करेल, अशी आम्ही वाट पाहत होतो. मात्र, मधल्या काळात तशी चिन्हं न दिसल्याने आम्हीच ते काढण्याचा निर्णय घेतला, रोहित सांगतो. हे ई-मॅगझिन आहे आणि त्याचे स्वरून कम्युनिटी मॅगझिन सारखं आहे. क्लबहॅक मॅगच्या साईटवर जावून कोणीही ते मोफत डाउनलोड करु शकतो. स्वत: रोहित, वरुण हिरवे, अभिजित पाटील, पंकित, दीपरंजन मोरे, आर्या भट्टाचार्य, अभिषेक नागर ही टीम सध्या क्लबहॅक मॅगचं काम सांभाळते आहे. फेब्रुवारी महिन्याचा अंक हा क्लब हॅक मॅगचा पहिला अंक होता, आणि आतापर्यंत, म्हणजे उण्यापुऱ्या पंधरा दिवसांतच त्याला २००० हून अधिक वाचकांनी भेट दिली असून ४०० हून अधिक वाचकांनी डाउनलोड केलं आहे.
क्लब हॅक मॅग अजून बाल्यावस्थेत असून, वाचकांच्या प्रतिसादावर त्याची पुढील दिशा ठरेल, असं रोहित म्हणतो. मात्र, पंधरा दिवसांत मिळालेला प्रतिसाद पाहता क्लबहॅक मॅगचं भवितव्य उज्ज्वल आहे हे सांगायला कुणा सायबर एक्सपर्टची गरज नाही.

हॅकिग शिकायचंय..?
हॅकेंगचे कोर्सेस पुण्यातही उपलब्ध आहेत. पुण्यात डेटा ६४ या संस्थेतर्फे हे कोर्सेस चालवले जातात. पुणे विदयापीठातील सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्कमध्ये ही संस्था आहे. हॅकिग कोणालाही शिकता येते. अर्थात संगणकाचं मुलभूत ज्ञान असणं आवश्यक आहे. शिकण्याची आवड हवी आणि त्याचा योग्य वापर करण्याचं बंधन स्वत:वर घालून घ्यायला हवं.

पूर्वप्रसिद्धी – लोकमत, ऑक्सिजन पुरवणी – दि.२६ फेब्रुवारी २०१०

आज की ताजा खबर!

बंधुत्वाच्या छद्मी “हाता”वर
सोनियाने रान पेटवलं
समभावाच्या राखेतच
“विष”मतेचं बिग “बी” रूजलं

लंगोटी यार!

एखाद्या लंगोट मित्राशी मैत्री कधी झाली, या प्रश्नाचं उत्तर जेवढं अवघड असतं, तेवढंच अवघड उत्तर आयुष्यात पुस्तकांचा प्रवेश कधी झाला या प्रश्नाचं आहे. पण अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची सवय आई-वडिलांमुळे लागली हे निश्चित. पहिली पुस्तकं वाचलेली आठवतात ती अर्थातच पंचतंत्र, इसापनीती वगैरे. मग अमर चित्रकथा, डायमंडची हिदीतली कॉमिक्स, अरेबियन नाईटस् आणि आपला फास्टर फेणे, बिपीन बुकलवार, नाथमाधवांची वीरधवल, सोनेरी टोळी अशी सुरुवात झाली. पाचवी-सहावीत असतानाच स्वामी, मृत्युंजय, श्रीमान योगी वडिलांनी हातात ठेवले. घरात काहीही वाचायला मोकळीक असल्याने आणि अभ्यास एके अभ्यास आणि माक्र्स हेच सर्वस्व हा त्यांचा दृष्टिकोन कधीच नसल्याने आम्ही (म्हणजे मी आणि माझा मोठा भाऊ) अधाशासारखं वाचन केलं. वर्तमानपत्रांशी, रविवारच्या पुरवण्यांशी आमची गट्टी अगदी त्या दिवसांपासूनची. त्यामुळे रोजचं वाचन हे रिच्युअल सारखं रूटीनचा अविभाज्य भाग बनलं असावं.
वाचनाचे फायदे आयुष्यात खूप झाले. पण तात्कालिक फायदा म्हणजे भाषेचा अभ्यास हा कधीच अभ्यास वाटला नाही. आम्ही तो एंजॉय केला. कारण ज्या लेखकांचे धडे आम्हाला पाठ्यपुस्तकात असायचे, त्यांचं लेखन बऱ्याचदा वाचलेलं असल्याने एक कम्फर्ट लेव्हल यायची.
वर्तमानपत्रांच्या वाचनामुळे भोवतालच्या जगाचं भान आलं. आपल्या परिघापलीकडचीही अनेक जगं आहेत, त्यांची ओळख या वाचनाने करून दिली. साहित्याची गोडीही वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांनी लावली, वाढवली. कारण तेव्हा प्रत्येक पुरवणीत दर्जेदार साहित्य हा एक अविभाज्य भाग होता. अगदी सर्व वर्तमानपत्रांमध्ये मोठमोठी साहित्यिक मंडळी लिहित होती आणि आमच्यासारख्यांवर संस्कार करीत होती.
वाचनाने जगाकडे पाहण्याचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू डेव्हलप होत गेला. चांगलं-वाईट, म्हणजे दर्जेदार आणि भिकार याच्यातला फरक शिकवला. ‘देअर इज मोअर टू द वर्ल्ड दॅन मीटस दी आय’ हा धडाही वाचनानेच दिला. आयुष्यात आपण प्रत्येक अनुभव घेऊ शकत नाही; पण असे अनेकानेक अनुभव वाचनातून मिळाले आणि प्रत्येक वाचनानंतर ‘हं.. आयुष्य असं असतं तर’ आणि ‘अरेच्चा ! आयुष्य असंही असू शकतं तर..’ अशी भन्नाट अनुभवांची तोंडओळख वाचनाने करून दिली.
मराठी वाचनाने दृष्टी व्यापक केली, तर इंग्रजी वाचनाने ती ग्लोबल व्हायला मदत झाली. कारण इंग्रजीचा एकूण जगभरातील संचार आणि वैविध्य यामुळे एक वेगळा आणि विविधांगांनी ‘रिच’ युनिव्हर्स समोर खुला झाला. आयुष्यातल्या कोणत्याही पैलूकडे मनमोकळेपणाने आणि नि:संकोचपणे पाहण्याची नजर, धीटपणा, झोकून देऊन भिडण्याची मानसिकता, क्वेश्चनिग स्पिरिट असे बरेच काही ‘गुण’ या वाचनाने दिले.
इंटरनेट आणि विशेषत: ब्लॉग्जच्या आगमनानंतर तर आपल्यासाठी इझीली अॅक्सेसिबल असं वाचनाचं ‘ट्रेजर ट्रव्ह’च खुलं झालंय. ‘आय ब्रो कसे करावे’ यापासून थेट ‘राजीनामा कसा लिहाल?’ इथपर्यंत पृथ्वीतलावरच्या आणि पृथ्वीबाहेरच्याही अनेक गोष्टींचं ज्ञान तिथे आहे. ब्लॉग्जमुळे लेखक आणि वाचक यांच्यातला फरकच संपुष्टात आल्यासारखं झालंय. प्रत्येकजण व्यक्त होतो आहे, अनुभव सांगतो आहे, ज्यातून आपल्यालाही शिकायला मिळतं.
प्रत्येक चांगलं पुस्तक, लेखन किंवा अगदी चारोळीसुद्धा आपल्याला काहीतरी देऊन जातच असते. त्यामुळे वाचनाने मला काय मिळालं याची यादी करायची झाल्यास ती वाचलेल्या पुस्तकांइतकीच मोठी होईल. वाचनाने संवेदनशीलता दिली, चांगल्या-वाईटाचं भान दिलं, बदलत्या जगाबरोबर बदलण्याची दृष्टी दिली. विचारांची स्पष्टता दिली, स्वत:ला तपासून पाहण्याची क्षमता दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसं वाचण्याचं कुतूहलही या वाचनानंच दिलं आणि जोपासलं. खऱ्या अर्थाने ‘एन्रिच्ड लाईफ’ वाचनाने दिलं.
त्याबद्दल ‘हॅटस ऑफ टू द रिटन वर्ड’!

पूर्वप्रसिद्धी – लोकमत ऑक्सिजन पुरवणी – दि.२६ मार्च २०१०

मूळ लेखाची लिंक -

http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/OxygenEdition-MainNews.php?articledate=2010-03-26

अतिथी देवो भव

समानशीले व्यसनेषु सख्यम्

नम्र आवाहन!

या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.
Marathi Mandali!

ईमेलद्वारे नवीन पोस्टस मिळवा.

Join 7 other followers

Follow

Get every new post delivered to your Inbox.