तर भाईनं पहिली मीटिंग घेतली शूटर शंभूसोबत.
भाईचे सगळे व्यवहार तसे रोखठोक.
स्पष्ट. अगदी एखाद्याचा गेम वाजवायचा असला, तरी त्याला सांगून सवरुन.
त्यामुळे मीटिंगमध्येही त्यानं शंभूला सांगितलं,
“शंभ्या, लेका हा असा प्रॉब्लेम आहे.”
“जागा एक और आदमी तीन.”
“भौत बडी नाइन्साफी है.”
“आता यातून बाहेर पडायचा मार्ग एकच आहे. काय?”
“अन तो कोन्चा भाई?”
शुटर शंभूनं आज्ञाधारकपणे विचारलं.
तर भाई म्हणाला,
“हे बघ शंभ्या, आपल्या धंद्याचा उसूल एकदम सीधा हाये.”
“ते म्हण्तात ना, जो जीता वही शिकंदर”
“तर आता त्याच उसुलप्रमाने आपल्याला तुमच्या तिघातला शिकंदर निवडायचा आहे.
समजलास?”
“होय भाई.”
“मग आता निघ आणि उद्याच्याला रात्री अकरा वाजता समुद्रकाठच्या गुदामात तयार रहा मुकाबल्याला.
तिथं तुमच्या तिघांत मुकाबला होईल.
आन मग जो जिता वो शिकंदर.”
भाई विषयीच्या आदराने शूटर शंभूचे डोळे भरून आले. त्याला अगदी भडभडूनच आलं हो.
भाईच खरा न्यायी, असं वाटलं त्याला. देशाचा पीएम होन्याची लायकी या मान्साची आसं पन तेवढृयापुरतं वाटलं त्याला.
भाईच्या पाया पडून तो गेला.
………………………………..
आता सुरेबाज सुरेशसोबतची मीटिंग.
तर भाई पुन्यांदा एकदा रोखठोक.
त्यानं सुरेशसोबतही जो जीता वोही शिकंदरचा एक शो केला.
त्याला बी उद्या रात्री अकराला समुद्राकाठच्या गुदामात बोलावला.
सुरेबाज सुरेशलाही वाटलं, भाई भारताचाच काय, अमेरिकेचाबी पीयेम बनायला पायजे.
भाईच्या पाया पडून तो पन चालता झाला.
………………………………….
आता मीटिंग सवाई भाईसोबत.
हा… चुकलात.
भाई इथं बी रोखठोक.
म्हणाला, “लेका, आयुष्यात आपन याच उसुलावर वागलो की जो जीता वोही शिकंदर. तवा तुला उद्याच्या गेम शो मध्ये एकतर शिकंदर व्हावं लागंन
न्हायतर जागेवर पानी सोडावं लागंन.
माज्या परीनं मी न्याय केलेला हाये, आता स्वताची पात्रता शिद्द करा.
आन या आता.”
सवाई भाईनं मान डोलावली, आन तो बी भाईच्या पायाला स्पर्श करुन चालता झाला.
तर आता समुद्रकाठचं गुदाम.
रात्री अकरा वाजता. गेम शो.
कौन बनेगा तिकिटपती?
……………………………….
समुद्राकाठचं गुदाम म्हणजे भाईचा पुराणा अड्डा.
म्हण्जे दिवार मधल्या अभिका बच्चनचा (हा खास भाईचा शब्द) कित्ता गिरवत भाई भाई झाला तेवापासुनचा.
भाईने आपले कारकिर्दितले सगळे महत्वाचे टप्पे हितंच साजरे केले.
भाईची फेवरेट प्लेस म्हणा हवं तर.
त्यामुळे आजच्या गुंत्याचा निकालबी हितंच लागनार हे ठरलेलंच.
खरं तर ठरलेलं काय असतं म्हना.
तो सर्वांच्या वर कोन बसलेला असतो, तो आधीच ठरवतो आन त्याला पायजे ते घडवून आन्तो.
त्यामुळं भाई तसा निश्चिंत.
आपन काय काळजी करायची, जे होईल ते होईल, असं तो मनाशी म्हणाला.
तर अकरा वाजून एक मिनिटांनी गुदामात पहिली एंट्री झाली, ती शूटर शंभूची.
बघतो तर सगळा अंधार.
पण गुदामाचा कोपरा न कोपरा माहित असल्यानं तो सराईत पावलं टाकीत पुढं चालला.
सूं…… धप्प.
अंधारातून विजेच्या वेगानं सुरा आला आन त्यानं शंभूच्या नरड्याचा वेध घेतला.
काम तमाम.
शंभूला ओरडायची पन संधी मिळाली नाय.
अकरा वाजून दोन मिनिटं.
धापा टाकीत सुरेबाज सुरेश गुदामात शिरला.
मिटृट काळोख.
पण चप्पा चप्पा माहीत असलेला सुरेश सावधपणे पुढे सरकला.
सूं…… धप्प.
एकच गोळी. वर्मी घाव. काम तमाम.
भाईनं दुसर्या दिवशी सकाळी साडेनवाला तातडीची मिटिंग बोलावली.
“हे बगा दोस्तांनो, आपल्या गँगेतले दोन खंदे मोहरे काल रातच्याला तिकिटाच्या लढाईत जीव गमावून बसले.
दोगांनाबी तिकिट हवं होतं, आन आम्ही दोघांनाबी सामोपचारानं, चर्चा करून तोडगा काडू असं सांगितलं होतं.
पन तिकिटाच्या मोहापायी भलती स्पर्धा करायला गेले आन दोगंबी एकमेकाला मारुन बसले.
आता प्रश्न असा आहे, की तिकिट कोनाला द्यायचं.
तर माला वाटतं की आता दोगंबी योग्य उमेदवारच उरले नसल्याने तिकिट सवाई भाईला देण्यात काय अडचण नसावी. काय?”
सर्वांनी माना डोलावल्या.
भाईला समाधान वाटलं.
वर बसलेल्यानं योग्य निकाल लावला होता.
“शाबास पोरा, घरान्याची इज्जत राखलीस.”
“ते तर मी जमवनारच होतो भाई.”
“सगळं व्यवस्थित करतो का नाय असं टेन्शन होतं.”
“छृया, येकदम सिंपल झालं, तुमी म्हटले, जो जीता वोही शिकंदर, पन कैसे जीता हे थोडीच विचारलं. म्हनलं कसा बी जिंकला तरी जो जिता वोही शिकंदर.
मग काय, पावनेअकरालाच गुदामाच्या माळृयावर जाउन बसलो.
इकडच्या दारानं शंभू आला, त्याला टिपला आन तिकडच्या दारानं सुरेश आला त्याला उडवला.
दोघांकडनं पिस्तुलगिरी आणि सुरेबाजी शिकलो त्याची गुरुदक्षिना देउन टाकली.
पन ती वरची जागा लय सोयीची ठरली.
त्यामुळंच तर ठरवलं तसं घडवता आलं.”
“पोरा, वरची जागा सोयीची असते म्हनूनच तर कायबी अन कवाबी आपल्या मनासारखं घडवता येतं, हे आता तुझ्या डोक्यात घुसलं ते बरं झालं.
तेवा वरच्या जागेवरच लक्ष आसू दे.”
“शेवटी आपल्या हातात काय आहे, वर बसलेला ठरवेल तसं होतं, काय समजलास?”
(समाप्त)
अमोल यांनी पोस्ट केले
अमोल यांनी पोस्ट केले
अमोल यांनी पोस्ट केले 






